जालना – राज्यातील फडणवीस सरकारच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने मागील नऊ दिवसात मराठवाड्यात काढलेल्या हल्लाबोल यात्रेची सांगलात झाली आहे. पक्षाच्या बड्या नेत्यांनी नऊ दिवसात दोन हजार किलोमिटरचा प्रवास करतांना मराठवाड्यातील सात जिल्हे आणि 26 तालुके पिंजून काढले आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तरूणाईची सर्वत्र उडालेली झुंबड पाहता युवक वर्ग मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसकडे आकर्षीत होत असल्याचे चित्र या यात्रे दरम्यान पाहण्यास मिळालं आहे.
1 डिसेंबर ते 11 डिसेंबर या काळात विदर्भात पदयात्रा काढुन हल्लाबोल केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने दुसर्या टप्प्यात मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत करत नऊ दिवसांची झंझावती हल्लाबोल यात्रा काढली. तुळजापूर येथून देविचे दर्शन घेवून सुरू झालेल्या या यात्रेचा जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे समारोप झाला. तर 3 फेब्रुवारी रोजी औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली निघणारा मोर्चा आणि जाहीर सभेने या मराठवाड्यातील यात्रेची सांगता होणार आहे.
COMMENTS