मराठवाड्यात राष्ट्रवादीला आणखी एक धक्का!

मराठवाड्यात राष्ट्रवादीला आणखी एक धक्का!

नांदेड – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील इन्कमिंग वाढत आहे. तर याचा सर्वात जास्त फटका राष्ट्रवादीला बसत असल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. मुंबईतील सचिन अहिर, चित्रा वाघ यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे खंदे नेते गणेश नाईक हे देखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. अशातच आता नांदेड राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठं खिंडार पडणार असल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचे जाहीर केलं आहे.

दरम्यान माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी भाजपात जाण्याचे संकेत दिले असून ते काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोरठेकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली तर नांदेडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. गोरठेकर यांचा नांदेडमध्ये मोठा जनसंपर्क असून त्यांच्यासह तेथील अनेक पदाधिकारी भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS