मुंबई – विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सत्तास्थापनेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महायुतीकडून जे आमदार निवडून आले आहेत. त्यापैकी आता काही आमदार मंत्रिपद मिळवण्यासाठी फिल्डिंग लावत असल्याची चर्चा आहे. मराठवाड्यात महायुतीला चांगलं यश मिळालं आहे. त्यामुळे मराठवाड्यातील काही आमदार मंत्रिपद मिळवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या अमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? हे पाहण गरजेचं आहे.
मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी या नेत्यांची फिल्डिंग ?
आमदार अतुल सावे
इच्छुकांच्या यादीमध्ये औरंगाबादमधील आमदार अतूल सावे यांचं नाव आघाडीवर आहे. गेल्या मंत्रिमंडळात सावे यांना उद्योग राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली होती. परंतु ते केवळ सहा महिनेच मंत्रिपदावर होते. त्यामुळे यावेळी मंत्रिपद मिळवण्यासाठी ते जोरदार प्रयत्न करत आहेत. तसेच औरंगाबाद शहरातून एकमेव भाजप आमदार असल्याने शिवसेनेवर वर्चस्व राखण्यासाठी सावेंना संधी मिळण्याची शक्यता आहे.
आमदार राणा जगजितसिंह
उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीतून भाजपात आणलेला मोठा चेहरा म्हणजे राणा जगजितसिंह. राष्ट्रवादी सोडताना भाजपाने त्यांना मंत्रिपदाचं वचन दिल्याची चर्चा आहे.
भाजपा आमदार प्रशांत
गंगापूरचे भाजपा आमदार प्रशांत बंब यांचं नावही चर्चेत आहे. बंब यांची ही तिसरी टर्म आहे. गेल्यावेळी त्यांचं मंत्रिपद थोडक्यात हुकलं होतं. मात्र यावेळी त्यांच्याकडे प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात आहे.
आमदार राहुल पाटील
शिवसेनेचे परभणीचे आमदार राहुल पाटील यांच्याही नावाची मोठी चर्चा आहे. आदित्य ठाकरेंचे जवळचे म्हणून त्यांची दावेदारीही प्रबळ मानली जात आहे.
आमदार संजय शिरसाठ
औरंगाबाद पश्चिमचे शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांचंही नाव चर्चेत आहे. गेल्यावेळी मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज होते. शपथविधीवरही त्यांनी बहिष्कार टाकला होता. पण यावेळी त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे.
आमदार सांदिपान भुमरे
पैठणचे शिवसेना आमदार सांदिपान भुमरे गेल्यावेळी मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होते. यावेळी मात्र त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे.
COMMENTS