मराठवाडा वॉटर ग्रीड योजना स्थगित केली जाण्याची शक्यता, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत!

मराठवाडा वॉटर ग्रीड योजना स्थगित केली जाण्याची शक्यता, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत!

औरंगाबाद – मराठवाडा वॉटर ग्रीड योजना गुंडाळण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे मराठवाडा वॉटर ग्रीड योजना स्थगित केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या योजनांपैकी ही योजना होती. मात्र अजित पवार यांनी या योजनेच्या व्यवहारिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. तज्ज्ञांनी या योजनेत योग्य व्यवहार झाला नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे इतर योजनेप्रमाणे ही योजना देखील राज्य सरकार गुंडाळणार असल्याचं चित्र दिसत आहे. यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे.

दरम्यान मराठवाड्यामध्ये पाण्याची समस्या आहे. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावे लागते. त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर आणि महिलांच्या आरोग्यावर देखील होतो. मराठवाडाची वॉटर ग्रीड योजना व्यवहारिक नसेल, पण ती बंद केल्याने लोकांच्या घशाला कोरड पडेल त्याचं काय? असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केलाय.

COMMENTS