मराठा आंदोलनाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा !

मराठा आंदोलनाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा !

मुंबई – राज्यभरात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं पाठिंबा दर्शवला आहे. माकपचे माजी आमदार आणि महाराष्ट्र राज्य सचिव नरसय्या आडम यांनी ही घोषणा केली आहे. तसेच नरसय्या यांनी मराठा समाजाला शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यामुळं मराठा आंदोलन हिंसक झाले असून  मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आला आहे. त्यांनी पंढरपूरला जायला हवं होते.  असंही नरसय्या आडम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं.शेतकरी आत्महत्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या करणारे मराठा समाजातील शेतकरी आहेत, तर त्या खालोखाल ओबीसी शेतकरी आहेत.  त्यामुळे  आरक्षणाची मागणी तीव्र होत असून खासगी क्षेत्रातही आरक्षणाची तरतूद असली पाहिजे. तसेच 9 ऑगस्ट रोजी ‘छोडो भारत’ आंदोलनात जेल भरो करणार असल्याचा इशाराही आडम यांनी दिला आहे.तसेच आरक्षणासह शेतकऱ्यांची सरसरकट कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाची अमलबजावणी यासाठी जेल भरो करणार असून  देशभरात 400 जिल्ह्यांत 10 लाख शेतकरी, कामगार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच 9 ऑगस्टला  भाजप सरकारच्या विरोधात किसान सभा आणि इतर समविचारी पक्ष करणार आंदोलन करणार आहेत. त्यामुळे भाजपच्या अडचणीत आणखी वाढ झाली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS