मध्य प्रदेश – मध्य प्रदेशात काँग्रेसला धक्का बसला असून स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा मायावतींनी केली आहे. राज्यातल्या 40 लोकसभा जागांपैकी 29 जागा बसपा स्वबळावर लढवणार असल्याचं मायावती यांनी म्हटलं आहे. मायावती यांच्या या घोषणेमुळे राहुल गांधी यांना धक्का बसला असून त्यांच्या स्वप्नांना सुरुंग लागला असल्याचं दिसत आहे.
दरम्यान मध्य प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बसपाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलं. त्यामुळं बसपा आणि काँग्रेस जवळ येत असल्याचीही चर्चा होती. परंतु लोकसभा निवडणुकीत मात्र मायावती यांनी एकला चलोची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला जर बहुमत मिळालं नाही तर छोट्या पक्षांचं महत्त्व वाढणार आहे. हा अंदाज आल्यान मायवतींनी स्वबळाचा नारा दिला असल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS