‘ते’ दलितांच्या भावनांशी खेळत आहेत – मायावती

‘ते’ दलितांच्या भावनांशी खेळत आहेत – मायावती

नवी दिल्ली – बहुजन समाज पक्षाच्या सर्वोसर्वा मायावती यांनी खळबळजनक आरोप केला आहे. भीम आर्मी, बहुजन य़ूथ फॉर मिशन २०१९ यांसारख्या संघटना विरोधकांकडून पडद्यामागून चालवल्या जात असल्याचं मायावती यांनी म्हटलं आहे. तसेच या संघटनांचे कार्यकर्ते दलित वस्त्यांमध्ये जाऊन आमच्या भोळ्या-भाबड्या लोकांची दिशाभूल करीत आहेत, त्यांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे.

दरम्यान या संघटना दलित वस्त्यांमध्ये जाऊन आम्ही मायावती यांना पंतप्रधान बनवणार असल्याचे सांगत आहेत. माझे नाव सांगून ते लोकांकडून निधीही उकळत आहेत. या संघटनांचे कार्यकर्ते आमच्या लोकांना उच्च जातीतील लोकांविरोधात भडकावत असल्याचंही मायावती यांनी म्हटलं आहे.

यावेळी मायावती यांनी मोदी सरकारही हल्ला केला असून पाच वर्षे आता पूर्ण होत आली आहेत. त्यांनी लोकांना दिलेल्या आश्वासनांपैकी ५० टक्केही कामे पूर्ण केली नाहीत. त्यामुळे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आता पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वास राहिला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS