मुंबई – राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर आता महापालिकेतही भाजपला धक्का देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत असल्याचं दिसत आहे. सोलापूर महानगरपालिकेत हे तिन्ही पक्ष एकत्र येणार असल्याचं दिसत आहे.सोलापूर महानगरपालिकेसाठी उद्या महापौरपदाची निवड होणार आहे. त्यामुळे या महापालिकेत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिकेत महाविकासआघाडीचा महापौर होणार असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान 102 जागा जागा असलेल्या महानगरपालिकेत भाजपचे 49 नगरसेवक आहेत. तर शिवसेनेचे 21, काँग्रेसचे 14 राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक आहेत. माकपकडे 1, अपक्ष आणि इतर 4 आणि एमआयएमचे 8 नगरसेवक आहेत. बहुमतात असणाऱ्या भाजपला दूर ठेवण्यासाठी महानगरपालिकेतील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत. त्यामुळे भाजप बहुमतात असले तरी महाविकास आघाडीला एमआयएमची साथ लाभली तर महाविकासआघाडीच्या महापौरपदाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमआयएम महाविकासआघाडीला साथ देणार का हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS