मुंबई – भाजपा नेत्यांचा सुरू असलेला वाचाळपणा पाहता त्यांच्यासाठी आता वेड्यांचे मोफत रुग्णालय सुरू करण्याची गरज असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. भाजपाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष पूनम महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्यावर टीका केली होती. पूनम महाजन यांनी विरोधकांच्या महागठबंधनला महाठगबंधन असे संबोधून शरद पवार यांना शकुनी मामा म्हणून त्यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध धनंजय मुंडे यांनी केला असून ट्विटरवरुन त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
आदरणीय @PawarSpeaks साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांवर @poonam_mahajan यांनी केलेली टीका निषेधार्ह आहे. महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती नाही. पवार साहेबांवर टीका करणारे राजकीयदृष्ट्या संपून गेले आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 6, 2019
‘शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांवर पूनम महाजन यांनी केलेली टीका निषेधार्ह आहे. महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती नाही. पवार साहेबांवर टीका करणारे राजकीयदृष्ट्या संपून गेले आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे’, ‘भाजपा नेत्यांचा सुरू असलेला वाचाळपणा पाहता त्यांच्यासाठी आता मोफत वेड्यांची हॉस्पिटल सुरू करण्याची गरज असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे. टोलाही त्यांनी लगावला आहे.
COMMENTS