मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण काँग्रेस नेते मिलिंद देवरा हे भाजपमध्ये जातील अशी च्चा आहे. मिलिंद देवरा यांच्याकडून नरेंद्र मोदींच्या ह्युस्टेन येथील भाषणाचे ट्विटद्वारे कौतुक करण्यात आले आहे.मोदींचे कौतुक करताना मिलिंद यांनी आपल्या वडीलांनी भारत – अमेरिका संबंध सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच उल्लेख केला आहे.
मिलिंद देवरांच्या ट्विटला पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरच उत्तर दिलं आहे. मोदींकडून मिलिंद देवरांच्या ट्विटचे आभार मानताना मुरली देवरा असते तर त्यांनाही भारत आणि अमेरिकेचे आजचे संबंध पाहून आनंद झाला असता असे म्हटलं आहे.
दरम्यान लोकसभेची निवडणूक हरल्यापासून मिलिंद देवरांनी अनेक वेळा भाजप समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. यापूर्वी त्यांनी कलम 370 चंही समर्थन केलं होतं. आणि आता कालच्या मोदींच्या भाषणाचंही मिलिंद देवरा यांनी कौतुक केलं आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्ची आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मिलिंद देवरा काँग्रेस पक्षापासून अंतर ठेवून आहेत, त्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
COMMENTS