दूध दरवाढीबाबत मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा !

दूध दरवाढीबाबत मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा !

नागपूर – राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरु असून अनेक ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दूध रस्त्यावर फेकले आहे. तसेच मुंबईच्या दिशेनं येणा-या दुधाच्या अनेक गाड्या रोखण्यात आल्या आहेत. या आंदोलनाचा परिणाम आज फारसा जाणवत नसून उद्या ग्राहकांसाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ देणार नाही. तसेच दूध पुरवठा सुरुळीत राहील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

दरम्यान दुधाला प्रतिलीटर पाच रुपये दरवाढ देण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. परंतु तीन रुपये दरवाढ देण्याची तयारी आम्ही दर्शवली असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच आम्ही राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा करायला तयार आहोत परंतु त्यांनाच चर्चा करायची नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे. ते नागपुरातील अधिवेशनादरम्यान बोलत होते.

 

COMMENTS