औरंगाबाद – महानगरपालिकेच्या परिसरात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली असून भाजप नेत्याची गाडी फोडण्यात आली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावावरून आज सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला होता. भाजपाच्या काही नगरसेवकांनी एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना बेदम मारहाण केली होती. त्याचे पडसाद उमटले असून एमआयएम नगरसेवक समर्थकांनी औरंगाबाद महानगरपालिका परिसरात दगडफेक केली आहे.
दरम्यान एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयासमोर भाजपा संघटन मंत्र्यांच्या गाडीची तोडफोड करून चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एमआयएम नगरसेवक मतीन यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर औताडे, प्रमोद राठोड यांनी पोलीस आयुक्तदरम प्रसाद यांची भेट घेतली. हे सर्व जात असताना भाजपा संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांच्या वाहनावर २० ते २५ जणांच्या टोळक्याने काठी, दगडाने हल्ला केला. भाजप आमदार अतुल सावे यांच्यासह पदाधिकारी पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी गेले. या वेळी भाजपा संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांची स्कार्पिओ गाडी सर्वात मागे होती या गाडीवर मतीन समर्थकांनी जोरदार दगडफेक केली. गाडी चालक विलास कोराळे यांना फरफटत नेत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याची माहिती आहे.
COMMENTS