हिम्मत होती तर एकेकाने यायचे होते – एमआयएम नगरसेवक

हिम्मत होती तर एकेकाने यायचे होते – एमआयएम नगरसेवक

औरंगाबाद   अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला लोकशाही पद्धतीने आम्ही विरोध केला. मात्र, भाजपचे नगरसेवकांनी थेट माझ्यावरच हल्ला चढवला. दहा-दहा जणांनी हल्ला करून सभागृहाचा अवमान केला, हिम्मत होती तर एकेकाने यायचे होते. मग त्यांना दाखवले असते असं वक्तव्य एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांच्या श्रद्धांजलीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध केला. त्यांनी विरोध करताच नगरसेवक राज वानखेडे, दिलीप थोरात, प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, उपमहापौर विजय औताडे यांनी मतीन यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर नगरसेवक मतीन यांच्या समर्थकांनी भाजप नेत्याच्या गाडीवर हल्ला केला आहे.

 

COMMENTS