कर्नाटक – कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे सध्या जोरदार वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. या निवडणुकीत काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं काँग्रेसला पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर आता एमआयएमनंही कर्नाटकात निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. तसेच या निवडणुकीत जेडीएसला पाठिंबा देणार असल्याचं ओवैसी यांनी म्हटलं आहे.
We will not contest in upcoming Karnataka elections, AIMIM will support JDS and will campaign for them. We feel both national parties have totally failed: Asaduddin Owaisi #KarnatakaElection2018 pic.twitter.com/wxQDgLjpl2
— ANI (@ANI) April 16, 2018
असदुद्दीन ओवैसी यांनी केलेल्या या घोषणेनंतर या निवडणुकीत जेडीएसचं वजन वाढणार असल्याचं दिसत आहे. तसेच कर्नाटकमधील एमआयएमच्या नेत्यांशी कालच ओवैसी यांनी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असून एमआयएमचा जेडीएसला पूर्णपणे पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
COMMENTS