एका मंत्र्याच्या 12 टक्के कमिशनची खमंग चर्चा ! “तो” मंत्री कोण ?

एका मंत्र्याच्या 12 टक्के कमिशनची खमंग चर्चा ! “तो” मंत्री कोण ?

एक  मंत्री विकास कामांचा निधी देण्यासाठी तब्बल १२ टक्के दराने पैसे मागत असल्याची खमंग चर्चा सध्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. हा मंत्री कोण ?  यावरही खल मांडला जावू लागला आहे. विशेष म्हणजे त्या मंत्र्याचा स्वीय सहाय्यकही अधिकाऱ्यांच्या दारात जावून खंडणीप्रमाणे पैसे मागत असल्याने पक्षाच्या बदनामीच्या भितीने कार्यकर्तेही चांगलेच वैतागले आहेत.
कोणी निंदा अथवा कोणी वंदा आमचा एकच धंदा याप्रमाणे हा मंत्री निधी देण्यासाठी त्याच्या पक्षातल्या लोकप्रतिनी सोडत नाही. सर्व पक्षाच्या लोकांना समान न्याय असंच या कमिशन बाजीत त्याचं धोरण आहे. निधीच्या नावाखाली तो लोकप्रतनिधींकडून १२ टक्क्याने पैसे वसूल करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात चांगलीच रंगू लागली आहे. हा निधी पक्षाच्या नेत्यांना देतो की स्वतःच्या खिशात टाकतो हे त्यालाच माहिती.

या कमिशनबाज मंत्र्याला आणि त्याच्या स्विय सहाय्यकालाला त्याच्या पक्षातलेही कार्यकर्ते चांगलेच वैतागले आहेत. पण करणार काय ?  हा मंत्री त्याच्या पक्षातला चांगलाच वजनदार आहे. तसंच वरीष्ठांशी चांगली जवळीक असल्याचंही काणावर येतंय. त्यामुळे तक्रार करणार तर कोणाकडे करायची असा प्रश्न स्थानिक पदाधिका-यांना पडला आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार त्यांना सहन करावा लागतोय.

ज्या अधिकाऱ्याकडून, लोकप्रतिनिधीकडून पैसे मिळतात, त्याला काम न करताच चांगले काम करीत असल्याचे प्रमाणपत्र द्यायचे. अन् जो पैसे देत नाही, त्याची तक्रार करायची, चौकशी करण्यास भाग पाडायच. अन पैशाची वसुली करायची. यामुळे अधिकारीही यावर दात धरून आहेत. हा नेता स्वतःला  १० टक्के आणि स्विय सहाय्यक 2 टक्के असं त्यांचं वाटप असल्याचीही चर्चा आहे. टक्केवारी नवी नाही. पण या मंत्रीसाहेबांचा रेट खूपच असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. 12 टक्के इथेच गेल्यावर खाली कार्यकर्तेही मग बिनभोबाट, त्यामुळे कामाच्या नावाने बोंबाबोंब, पण यामध्ये प्रामाणिकपणे काम करणा-या कार्यकर्ते आणि अधिका-यांची चांगलीच कुचंबना होत आहे.

ही बातमी देण्याचं मुळात कारणच हे आहे की एवढ्यावरून तो मंत्री त्यांच्या पक्षातील नेत्यांनी शोधावा आणि त्याला योग्य तो संदेश द्यावा हीच अपेक्षा आहे. बघुया काय होतं ते.

COMMENTS