आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा!

आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा!

मुंबई – आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा  दिला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. दीपक सावंत यांच्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०१८ रोजी संपली आहे. त्यामुळे त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आहे. शिवसेनेने सावंत यांच्या जागी मंत्रिपदासाठी दुसरे नाव सुचविण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून याबाबत आज उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार आहेत.

दरम्यान आगामी निवडणुकीत एकला चलोची भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. सत्तेत असुनही भाजप नेतृत्वावर शिवसेनेनं अनेकवेळा टीका केली आहे.  या पार्श्वभूमीवर मंत्रिपदासाठी एका नावाची शिफारस केल्यास शिवसेना सत्तेसाठी हपापलेली आहे, अशी टीका होऊ शकते व जनतेमध्ये चुकीचा संदेश जाईल.

स्वबळाचा निर्णय जाहीर केल्यापासून शिवसेना सत्तेबाहेर कधी पडणार, हा प्रश्न विरोधकांकडून सातत्याने विचारला जात आहे. त्यामुळे तूर्तास शिवसेनेच्या अन्य चार कॅबिनेट मंत्र्यांपैकी एकाकडे आरोग्य खात्याचा कार्यभार देईल असं बोललं जात

COMMENTS