मंत्री जयकुमार रावल यांना पक्षाकडून क्लीनचिट !

मंत्री जयकुमार रावल यांना पक्षाकडून क्लीनचिट !

नवी दिल्ली – मंत्री जयकुमार रावल यांना भाजपकडून क्लिनचिट देण्यात आली आहे. रावल यांच्यावर होत असलेल्या जमीन अपहार प्रकरणांवर पक्षाकडे खुलासा करण्यासाठी रावल यांनी काल दिल्लीत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली होती. जयकुमार रावल यांनी त्यावेळी सर्व कागदपत्रं सादर करून आपल्यावरील आरोप राजकीय हेतूनं होतं असल्याचं सांगितलं. त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी रावल यांना क्लीनचिट दिली असून पक्ष तुमच्या पाठिशी असल्याचं म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसात रावल यांच्यावर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तोरणमाळ हिल रिसॉट या कंपनीशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा जयकुमार रावल यांनी केला होता. मात्र झी 24 तास या खाजगी वाहिनीने रावल यांचा दावा पुराव्यानिशी खोडून काढला आहे. तोरणमाळ रिसॉटचे संचालक असल्याचा आणि त्याच्या सातबारावर रावल यांचं नाव असल्याचं आढळून आलं आहे. परंतु तरीही रावल यांना पक्षानं पाठिंबा देऊन त्यांना क्लीनचिट दिली आहे.

COMMENTS