आर. आर. पाटील यांच्यामुळेच मी धाडसी विधाने करतो, सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आठवणींना उजाळा !

आर. आर. पाटील यांच्यामुळेच मी धाडसी विधाने करतो, सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आठवणींना उजाळा !

सांगली – राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्यामुळे मी धाडसी विधाने करतो असं वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. मिरज रस्त्यावरील महात्मा गांधी विद्यार्थी वसतीगृहाच्या आवारातील नियोजित आर. आर. पाटील स्मृती स्मारकाच्या भूमीपुजनावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आबांच्या पत्नी तथा तासगावच्या आमदार सुमन पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर  नेतेही उपस्थित होते.व्यासपीठावर उपस्थिती होती. सुमारे अठरा कोटी रुपये खर्च करून स्मारक होणार आहे.

दरम्यान आर. आर. आबांचे स्मारक १६ मार्च २०२० पर्यंत पूर्ण होणार असून तेव्हाही स्मारकाचे उद्घाटन मीच मंत्री म्हणून करणार असल्याचा विश्वासही यावेळी  अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच मुनगंटीवार यांनी यावेळी आबांसोबतचे आपले मैत्रीपूर्वक संबंधही उलगडले.

मी नवखा आमदार म्हणून विधानसभेच्या ग्रंथालयात गेल्यानंतर गेल्या पाच वर्षातील कुणाची भाषणे मी वाचू, असा प्रश्न मी ग्रंथपाल बाबा वाघमारे यांना केला होता. त्यावेळी त्यांनी मला आर. आर. यांचे नाव सांगितले होते. त्याअर्थाने आर. आर. माझ्यासाठी प्रेरणादायी होते. युतीचा आमदार म्हणून १९९५ च्या विधानसभेत मी पहिले भाषण केले. त्यानंतर “तुम्ही चांगले भाषण केलेत. तुमचा भविष्यकाळ उज्वल आहे.’ असे पत्र आबांनी मला आवर्जून पाठवले होते. त्यामुळे मी माझ्या राजकीय कार्यकाळात त्यांच्यामुळे धाडसी विधान करत आहे असंही यावेळी मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS