सोलापूर – सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असल्याचं दिसून येत आहे. कारण सोलापुरातील देशमुख यांचा बंगला बेकायदेशीर असल्याचा अहवाल महापालिका आयुक्तांनी दिला आहे. देशमुख यांचा बंगला आरक्षित जागेत आहे. या बंगल्याखालची जमीन पालिकेच्या अग्नीशमन विभाग, व्यापारी गाळ्यांसाठी आरक्षित आहे. त्याठिकाणी देशमुख यांनी आपला टोलेजंग बंगला बांधला आहे. त्यामुळे हा बंगला बेकायदेशी असल्याचा अहवाल पालिका आयुक्तांनी दिला आहे.
दरम्यान 26 पानांचा हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. अहवालात सुभाष देशमुख यांच्या बंगल्याच्या बांधकामावर अनेक आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. अग्निशमन दलाच्या आरक्षित जागेवर हा बंगला बांधल्याचं अहवालातून स्पष्ट करण्यात आलं आहे. सोलापूर महापालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे यांनी हा अहवाल सादर केला आहे.
दरम्यान सुभाष देशमुख यांना एक मिनिटही मंत्रिपदावर कायम राहण्याचा अधिकार नसून मुख्यमंत्र्यांनी कारवाई करत बंगला तातडीने जमीनदोस्त करण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस हे देशमुखांवर कारवाई करणार का असा विरोधकांकडून केला जात आहे.
COMMENTS