राज्यपाल, मंत्र्यांसाठी आनंदाची बातमी, आपल्या पसंतीनुसार खरेदी करता येणार वाहन!

राज्यपाल, मंत्र्यांसाठी आनंदाची बातमी, आपल्या पसंतीनुसार खरेदी करता येणार वाहन!

मुंबई – राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री या सर्वांना आपल्या पसंतीनुसार वाहन खरेदी करता येणार आहे. राज्य सरकारने याबाबत शासन निर्णय आणला असून या निर्णयानुसार राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उच्च न्यायालय मुख्य न्यायमुर्तींना त्यांच्या पसंतीनुसार वाहन खरेदी करता येणार आहे. यासाठी किंमत मर्यादा नसणार आहे. तसेच राज्यातील जिल्ह्यांमध्ये दौऱ्यावर येणारे मंत्रिमंडळ सदस्य, कॅबिनेट मंत्री, उच्च न्यायालय न्यायाधिश, उप लोक आयुक्त, राज्यमंत्री यांना वाहन खरेदीसाठी २० लाखांची मर्यादा असणार आहे.

दरम्यान शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या दर्जानुसार शासकीय वाहन खरेदीबाबत संभ्रम निर्माण होता. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मुख्यसचिव, महाधिवक्ता, राज्य निवडणूक आयुक्तांना वाहन खरेदीची मर्यादा १५ लाखांपर्यंत असणार आहे. तसेच राज्यपालांचा परिवार तसेच राज्यस्तरीय वाहन आढावा समितीती मान्यता दिलेल्या अधिकाऱ्यांसाठी वाहन खरेदी मर्यादा ही ८ लाखांच्या आत असणार आहे. वाहनाच्या बदल्यात नवे वाहन खरेदी करण्याचा प्रस्ताव वाहन आढावा समितीच्या मान्यतेने मंजुर होणार आहे. त्यामुळे या अधिकाय्रांसह राज्यपाल, मंत्री यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

COMMENTS