मुंबई – राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज भाजप आणि शिवसेना मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर काळे आकश कंदील लावले. फसवी कर्जमाफी, राज्यातील लोड शेडिंग, रेशनच्या दुकानांमधील साखर गायब, महिलांची असुरक्षितता, वाढती महागाई आदी कारणांमुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. एकप्रकारे सरकारने राज्यातील जनतेवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली आहे, असा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप आणि शिवसेना मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर काळे आकश कंदील लावत सरकारचा निषेध केला.
शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी सरकारच्या शिक्षण धोरणाचा निषेध करत, विनोद तावडेंच्या घराबाहेर काळा आकाश कंदील लावला. यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले.
COMMENTS