आदित्य ठाकरेंकडे असणार हे मंत्रिपद, शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी!

आदित्य ठाकरेंकडे असणार हे मंत्रिपद, शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी!

मुंबई – शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार लवकरच स्थापन होणार असल्याची चिन्ह आहेत. यासाठी तिन्ही पक्षांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली आहेत. त्यानंतर आता शिवसेनेच्याही काही संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली आहेत.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये 16-14-12 चा फॉर्म्युला ठरल्याचे बोललं जात आहे. संभाव्य मंत्रिमंडळानुसार शिवसेनेला जवळपास 16 मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती आहे.

या संभाव्य मंत्रिमंडळात युवासेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची शालेय शिक्षणमंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर शिवसेना नेते आणि आमदार एकनाथ शिंदे यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार दिला जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय रवींद्र वायकर यांची नगरविकास मंत्रीपदी वर्णी लागू शकते. तसेच उदय सामंत यांना गृहनिर्माण मंत्रिमंडळाचा कारभार कारभार दिला जाण्याची माहिती आहे. तर सुभाष देसाई यांना उद्योग, अब्दुल सत्तार यांना अल्पसंख्याक मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच दिवाकर रावते, दीपक केसरकर, रामदास कदम, दादा भुसे, अनिल परब, गुलाबराव पाटील, प्रकाश आबिटकर, बच्चू कडू, अंबादास दानवे या आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

अजित पवार

धनंजय मुंडे

छगन भुजबळ

जयंत पाटील

नवाब मलिक

हसन मुश्रीफ

अनिल देशमुख

अनिल देशमुख

दिलीप वळसे पाटील

राजेश टोपे

मकरंद पाटील

काँग्रेस संभाव्य नेत्यांची यादी

अशोक चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण

बाळासाहेब थोरात

विजय वडेट्टीवार

यशोमती ठाकूर

सतेज बंटी पाटील

सुनिल केदार

के सी पाडवी

विश्वजीत कदम

COMMENTS