भाजप-शिवसेनेच्या मंत्रिमंडळात एक मुख्यमंत्री तर दोन उपमुख्यमंत्री असणार?

भाजप-शिवसेनेच्या मंत्रिमंडळात एक मुख्यमंत्री तर दोन उपमुख्यमंत्री असणार?

मुंबई –  विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्ता स्थापनेसाठी पडद्यामागे हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपला अवघ्या १०५ जागा मिळाल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी ५६ जागा मिळालेल्या शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 50-50 फॉर्म्युला सांगून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदावरही दावा केला आहे. मात्र जर मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेलं तर उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे जाईल हे निश्चित आहे. त्यामुळे शिवसेनेचा जर उपमुख्यमंत्री झाला, तर भाजपकडूनही आणखी उपमुख्यमंत्रीपद दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेकडून आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्री होतील आणि भाजपकडून चंद्रकांत पाटील यांना उपमुख्यमंत्री केलं जाईल अशी चर्चा आहे.

दरम्यान या निवडणुकीत पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, राम शिंदे, संजय भेगडे, विजय शिवतारे, परिणय फुके, अर्जुन खोतकर आणि अनिल बोंडे या 8 मंत्र्यांचा पराभव झाला आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, एकनाथ खडसे यांना भाजपनं उमेदवारीच दिली नव्हती. त्यामुळे या नेत्यांच्या जागी आता नवीन नेत्यांनी मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. त्यामुळे कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS