मीरा भाईंदर – भाजपच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान करुनही मीरा भाईंदरच्या महापौरपदी भाजपचा उमेदवार विराजमान झाला आहे.मीरा भाईंदरच्या महापौरपदी भाजपच्या ज्योती हसनाळे, तर उपमहापौरपदी भाजपच्या हसमुख गेहलोत यांची निवड झाली आहे. ज्योत्स्ना हसनाळे या 55 मतं मिळवत विजयी झाल्या आहेत. तर भाजपच्या पाच नगरसेवकांच्या मतांमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत शिर्के यांना 36 मतं मिळाली.
दरम्यान मीरा भाईंदर महापालिकेत शिवसेनेकडे 22, काँग्रेसकडे 12 नगरसेवक आहेत. परंतु शिवसेना नगरसेविका दीप्ती भट आणि अनिता पाटील तर काँग्रेस नगरसेविका सारा अक्रम खान अनुपस्थित राहिल्याने मतदानावेळी सभागृहात महाविकास आघाडीचं संख्याबळ 31 वर पोहचलं. तर भाजपचं संख्याबळ 61 आहे. परंतु भाजप नगरसेवक विजय राय अनुपस्थित राहिल्याने आणि भाजपच्या मोरस रॉड्रिंक्स, अश्विन कसोदरिया, वैशाली रकवी, परशुराम म्हात्रे आणि गीता जैन या पाच नगरसेवकांनी शिवसेना उमेदवाराला मतदान केल्याने 61 संख्याबळ असतानाही भाजप उमेदवाराची मतसंख्या 55 वर आली. परंतु बहुमताचा आकडा 48 असल्यामुळे सत्ताधारी भाजपचं पारडं जड राहिलं.
COMMENTS