नवी दिल्ली – महिला पत्रकार पल्लवी गोगोई यांनी आपल्यावर बलात्कार केला असल्याचा आरोप एम जे अकबर यांच्यावर केला होता. याबाबत एम जे अकबर यांनी अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. आपच्यातील शरीरसंबंध परस्पर संमतीने होते अशी कबुली एम जे अकबर यांनी दिली आहे. पल्लवी गोगोई यांनी आरोप केले आहेत, त्यावेळी एम. जे. अकबर एशियन एज वृत्तपत्राचे संपादक होते. एशियन एज या वृत्तपत्रात कार्यरत असताना एम. जे. अकबर यांनी जयपूरमधील हॉटेलच्या खोलीत माझ्यावर बलात्कार केला असल्याचा दावा गोगई यांनी केला आहे. याबाबतचं स्पष्टीकरण एम जे अकबर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलं आहे.
Former Union Minister #MJAkbar in a statement to ANI denies rape allegations levelled against him by journalist Pallavi Gogoi in Washington Post. pic.twitter.com/RqWYuQycgu
— ANI (@ANI) November 2, 2018
दरम्यान ‘1994 च्या आसपास मी आणि पल्लवी गोगोईने परस्पर संमतीने एकमेकांशी संबंध ठेवले. काही महिने हे संबंध टिकले. या संबंधांमुळे अनेक चर्चा झाल्या. इतकंच नाही तर माझ्या कुटुंबातही कलह निर्माण झाला होता. त्यानंतर परस्पर संमतीने ठेवलेले हे संबंध संपवण्यात आले होते असंही एम जे अकबर यांनी म्हटलं आहे.
तसेच ‘ज्यांनी माझ्यासोबत काम केलं आहे आणि दोघांनाही ओळखतात त्यांनी वस्तुस्थिती मांडण्यासाठी साक्ष देण्याची तयारी दर्शवली आहे. कार्यालयात काम करत असताना पल्लवी गोगोई तणावात होत्या का ? किंवा तसं वाटलं का हे देखील ते सांगतील’, असंही एम जे अकबर यांनी सांगितलं आहे.
COMMENTS