मुंबई – ओल्या दुष्काळाबाबत आमदार बच्चू कडू यांनी आज मुंबईत मोर्चा काढला. या मोर्चात त्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना त्वरीत मदत करावी, तसेच पीक विम्याची रक्कम ताबडतोब मिळावी, या मागण्या केल्या आहोत. यावेळी मुंबईत राजभवनाच्या दिशेने जाणारा हा मोर्चा पोलिसांनी अडवला तसेच बच्चू कडू यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे.
दरम्यान बच्चू कडू यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत, पोलिसांची गाडी अडवली. तसेच आपला भिडू बच्चू कडू, अशा घोषणा देत, आंदोलक शेतकय्रांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. परतीच्या पावसाने राज्यातील शेतकय्रांचं मोठ नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे राज्याच्या सत्तासंघर्षाचा तिढा सुरु आहे. हा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी हा मोर्चा काढला आहे.
COMMENTS