नवी दिल्ली – बलात्काराचा आरोप करणारी ननही ही वेश्याच आहे. मी माझ्या विधानावर ठाम असून मला कोणीही समन्स बजावला तरी काही फरक पडत नसल्याचं वक्तव्य केरळमधील अपक्ष आमदार पी. सी. जॉर्ज यांनी केलं आहे. जालंधर प्रांताचे बिशप फ्रँको मुलक्कल यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपानंतर आमदार जॉर्ज यांनी ‘ती नन वेश्या आहे यामध्ये कोणालाही शंका नाही. १२ वेळेस तिने मजा घेतली आणि १३ व्यांदा हा बलात्कार कसा झाला? जेव्हा पहिल्यांदा बलात्कार झाला होता, तेव्हाच तिने तक्रार का केली नाही?’ असं वक्तव्य केलं होतं.
दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने जॉर्ज यांना समन्स बजावला आहे. २० सप्टेंबरपर्यंत त्यांना महिला आयोगापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, महिला आयोगाच्या समन्सनंतरही आमदार जॉर्ज आपल्या विधानावर ठाम आहेत. इतकंच नाही तर कोणत्याही महिला आयोगाला माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा अधिकार नसल्याचं जॉर्ज यांनी म्हटलं आहे.
COMMENTS