अमरावती – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सध्या केवळ एक आमदार आहे. अमरावतीचे आमदार देवेंद्र भुयार हे विधीमंडळात आपल्या पक्षाची भूमिका मांडत आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून ते नाराज असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यात आणि स्वाभिमानीचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा रंगत आहे.
याबाबत आमदार देवेंद्र भुयार यांनी खुलासा करत एका वर्षात मी पश्चिम महाराष्ट्रात गेलो नाही. कोणत्याही आंदोलनात सहभाग घेतला नाही. पण मी राजू शेट्टीच्या संपर्कात आहे, असं स्पष्टीकरण दिले.
आमदार देवेंद्र भुयार म्हणाले, “संघटनेच्या विस्तारासाठी जे मला प्रवास करायला पाहिजे ते मी सध्या करु शकत नाही. मी माझ्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करत आहे. राजू शेट्टी किंवा रविकांत तुपकर यांच्या कोणत्याच कार्यक्रमात फोटो नसल्याचा आरोप चुकीचा आहे. एका वर्षात स्वाभिमानी संघटनेचा कोणताच कार्यक्रम घेता आलं नाही पण जे कार्यक्रम झाले त्यावर राजू शेट्टी, रविकांत तुपकर यांचा बॅनरवर फोटो होते.” बिल्ले न लावण्याचा कारण काय, यावर आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की, “मी दोन बिल्ले लावत असतो. सध्या तर मला दोन बिल्ले लावावे लागत आहे एक विधानसभेचे आमदारचं आणि दुसरा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं.”
COMMENTS