मुंबई – राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप-शिवसेनेकडून जोरदार हालचाली सुरु आहेत. शिवसेनेने आपली ताकद वाढवण्यासाठी अपक्ष आमदारांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर काल रामटेक आणि भंडारा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार आशीष जैस्वाल आणि नरेंद्र गोंडेकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली आहे. त्यानंतर आज भाजपनेही एक अपक्ष आमदार आपल्या गळाला लावला आहे. बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजप आमदारांच्या संख्येत भर पडली आहे.
Various leaders and newly elected MLAs including some independents met CM @Dev_Fadnavis to congratulate him for victory in Assembly elections. CM also wished them all the success. pic.twitter.com/lDZIsOiKjC
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 25, 2019
दरम्यान राजेंद्र सोपल यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी भाजपाला जाहीर पाठिंबा असल्याचे म्हटलं आहे. युतीमध्ये शिवसेनेला जागा सुटल्याने राऊत यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. भाजपचे बंडखोर राजेंद्र राऊत यांना 95 हजार 482 मतं मिळाली. तर दिलीप सोपल यांना 92 हजार 406 मतं मिळाली. राजेंद्र राऊत यांनी सोपल यांचा 3076 मतांनी पराभव केला आहे. त्यानंतर त्यांनी आज भाजपला पाठिंबा दर्शवला आहे.
COMMENTS