मुंबई – काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना उप अभियंत्याच्या अंगावर चिखल टाकण चांगलच महागात पडलं आहे. मुंबई गोवा महामार्गावर खड्डे पडल्याने आणि चिखल उडत असल्याने नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा रोष उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना सहन करावा लागला होता. आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदीवरच्या पुलाला बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या होत्या. त्यानंतर नितेश राणे यांच्याविरोधात उपअभियंता प्रकाश शेडेकर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यामुळे पोलिसांनी राणे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
Congress MLA Nitesh Narayan Rane surrenders before Kankavali police. FIR has been registered against him & 40-50 supporters under Sections 353, 342, 332, 324, 323, 120(A), 147, 143, 504, 506 of IPC. He & his supporters threw mud on an engineer earlier today. pic.twitter.com/QG9bQpofzT
— ANI (@ANI) July 4, 2019
दरम्यान नितेश राणे यांनी संतापलेल्या स्वरातच उप अभियंत्याला खड्ड्यांबद्दल जाब विचारला होता. लोकांच्या अंगावर चिखल उडतो तो तुम्हाला दिसत नाही का? रस्त्यावर पडलेले खड्डे तुम्हाला दिसत नाही का? चिखल उडाल्यावर कसं वाटतं तुम्हीच बघा असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना चिखल ओतायचा आदेश दिला. त्यानंतर तातडीने दोन-चार कार्यकर्त्यांनी उप अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या डोक्यावर चिखलाने भरलेल्या बादल्या रिकाम्या केल्या. याबाबत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
तसेच नितेश राणे यांचे वडील आणि राज्यसभा खासदार नाराय़ण राणे ही अत्यंत चुकीची कृती असल्याचं म्हटलं आहे. माझं याला अजिबात समर्थन नसून महामार्गाच्या मुद्द्यावरुन आंदोलन करणं योग्य आहे, पण त्याच्या समर्थकांनी अशाप्रकारे हिंसा करणं चुकीचं आहे. मी याला समर्थन देत नाही’, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS