पुणे – लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळमधील घोटाळ्याला नवं वळण मिळण्याची शक्यता असून आमदार रमेश कदम यांच्या पत्नीसह एकाला गुन्हे अन्वेषण विभागानं अटक केली आहे. रामेश्वर गाडेकर (वय 30) व प्रतिभा रमेश कदम (वय 40, रा. बोरीवली,मुंबई) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. गाडेकर याने सीबीआयपुढे दोन दिवसांपूर्वी आत्मसमर्पण केले, त्यानंतर त्यास अटक करण्यात आली. तर प्रतिभा कदम यांना त्यांच्या राहत्या घरातुन अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे.
दरम्यान गाडेकर याचा आर्थिक घोटाळ्यात सहभाग असल्याचं बोललं जात आहे तर रमेश कदम यांच्या पत्नीकडुन बॅंकेच्या संयुक्त खात्याचा वापर करण्यात आल्याचा दावा सीबीआयनं केला आहे. सीबीआयने अटक केलेल्या गाडेकर व कमलाकर ताकवले या दोघांनी सेठी ब्रदर्सचा साखर कारखाना विकत घेण्यासाठी 5 कोटी रूपयांचा आर्थिक व्यवहार केला होता. हे पाच कोटी रुपये कदम याने केलेल्या आर्थिक घोटाळ्यातील होते. तर कदम याचे बँक अकाउंट प्रतिभा कदम यांच्या नावावर संयुक्तपणे होते. त्याचा वापर त्यांच्याकडुन केला जात होता. याची माहिती मिळताच सीबीआयनं या दोघांनाही ताब्यात घेतलं आहे.
COMMENTS