कर्नाटक – एका आमदाराने चहा विकून 10 मिनीटात पाच हजार कमावले आहेत. कर्नाटकमधील जेडी (एस) चे बंडखोर आमदार जमीर अहमद मैसूर यांनी ही करामत केली आहे. जमीर यांनी एका चहाच्या दुकानातच चहा विकून त्यांनी 10 मिनीटात पाच हजार कमावले आहेत. तसेच जमीर यांनी कमावलेले सर्व पैसे चहाच्या दुकानवाल्याला दिले असून स्वत:कडचेही १० हजार रुपये त्यांनी त्याला दिले असल्याची माहिती आहे. याबाबातची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने छापली आहे.
दरम्यान रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनासाठी आमदार जमीर हे आपले सहकारी वासु यांच्यासोबत गेले होते. त्यावेळी उद्घाटनानंतर ते एका चहाच्या टपरीवर गेले आणि चहा विकू लागले. आमदाराला चहा विकताना पाहून तिथे गर्दी जमू लागली. अधिकारी, पार्टी कार्यकर्ते आणि सर्वसाधारण जनताही आमदाराच्या हस्ते चहा घेण्यासाठी गर्दी करू लागले. बघता बघता मोठी गर्दी वाढली. विशेष म्हणजे एका चहाची किंमत पाच रुपये असतानाही आमदाराच्या हस्ते चहा घेत असल्यामुळे अनेकांनी एका चहाला शंभर, दोनशे, पाचशे रुपये दिले त्यामुळे दहा मिनीटात पाच हजारांची कमाई होती आणि या कमाईमुळे चहावाल्याला मोठा फायदा झाला आहे.
COMMENTS