मुंबई – साताऱ्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज राजीनामा दिला आहे. शिवेंद्रराजे भोसले यांनी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. तसेच शिवेंद्रराजे उद्या (31 जुलै) रोजी सकाळी मुंबईत 11 वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत बाजार समिती, खरेदीविक्री संघ आणि जिल्हा बँकेचे संचालकही भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान शिवेंद्रराजे 2004 पासून सातारा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून शिवेंद्रराजे आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांच्यातीला वाद विकोपाला गेला होता. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘उदयनराजेंचं मी बघतो, तुम्ही पक्ष सोडू नका’, अशा शब्दात शिवेंद्रसिंहराजेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तरीही आज अखेर त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.
COMMENTS