मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारने आज विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध केलं.महाराष्ट्र विकास आघाडीकडे 169 आमदारांचं संख्याबळ आहे. प्रस्तावाच्या बाजूने 169 आमदारांनी मतदान केलं. तर विरोधात 0 आमदारांनी मतदान केलं. यावेळी तटस्थ 4 आमदार राहिले. मनसे 1 आणि एमआयएम 2, माकप 1 या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली. त्यामुळे ठाकरे सरकार हे अग्निपरीक्षेत पास झाले आहे.
दरम्यान यानंतर तटस्थ राहिलेल्या एमआयएमच्या दोन आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे. एमआयएमचे धुळे शहर मतदारसंघातून फारूक शाह तर मालेगाव मध्य मतदारसंघातून मुफ्ती मोहम्मद इस्माईल हे दोन आमदार निवडून आले आहेत. विश्वासदर्शक ठराव पार पडल्यानंतर आमदार मोहम्मद इस्माईल यांनी सभागृहात उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शवला.
आम्ही जरी तटस्थ राहिलो असलो, तरी मी उद्धव ठाकरेंना आश्वासन देतो की तुम्हाला जेव्हा केव्हा आमची गरज पडेल. तेंव्हा आम्ही तुमच्यासोबत आहोत. आमचा पक्ष लहान आहे. मी एमआयएममधून निवडून आलो आहे. माझ्यासोबत आमच्या पक्षातून निवडून आलेला आणखी एक सदस्य आहे. निवडून आल्यानंतर आमच्या पक्षाच्या नेतृत्वामुळे आम्ही तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. मात्र विश्वासदर्शक ठरावावेळी आम्ही तटस्थ राहिलो असलो, तरी मी उद्धव ठाकरेंना आश्वासन देतो की तुम्हाला जेव्हा केव्हा आमची गरज पडेल. आम्ही तुमच्यासोबत आहोत असं मोहम्मद इस्माईल यांनी यावेळी म्हटलं आहे.
COMMENTS