“या” आमदराच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला, बातमीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ !

“या” आमदराच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला, बातमीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ !

पुणे –सोमवारी संध्याकाळी एका आमदराच्या हत्येचा कटाची बातमी आली आणि जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. पुणे जिल्ह्यातील दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या खुनाचा कट उघडकीस आला आहे. पोलीसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक देखील केली आहे. सागर विनायक भानवसे राहणार कवठे चा मळा वरवंड आणि आकाश राजेंद्र होले राहणार पाटस यांना पोलिसांनी अटक केली आहे.

राहुल कुल हे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आहेत. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार राहुल कुल यांच्या खुनाचा कट रचण्यात आला असल्याची माहीती पोलीसांना खब-यांमार्फत मिळाली होती. त्याचा तपास केल्यानंतर खुनाचा हा कट उघडकीस आला. अवजड वाहनाच्या धडकेने आमदार कुल यांच्या गाडीला अपघात करण्याचा किंवा विहिरीच्या ब्लास्टींगसाठी वापरण्यात येणार्या स्फोटकांनी गाडी उडविण्याचा हा कट होता.  हत्येच्या कटाचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, प्रशासन स्वच्छ करण्याच्या मोहीमेमुळे हितसंबंध दुखवलेल्या समाजकंटाकाचा यामागे हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS