आमदारांच्या प्रवास भत्त्यात तिपटीने वाढ !

आमदारांच्या प्रवास भत्त्यात तिपटीने वाढ !

नागपूर – राज्यातील आमदारांच्या प्रवास भत्त्यात तिपटीने वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात होणारी वाढ , जनतेच्या कामासाठी, अधिवेशन, बैठकांसाठी फिरावे लागत असल्यामुळे आमदारांच्या प्रवास भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली असल्याची माहिती गिरीष बापट यांनी दिली आहे. त्यामुळे आमदारांचा प्रवास भत्ता प्रति किलोमीटर 6 रुपयांवरून 20 रुपये करण्यात आला आहे.  आधिवेशानादरम्यान या सुधारणा विधेयकाला एकमताने मंजूर देण्यात आली आहे.

दरम्यान प्रवास भत्त्यामध्ये तिपटीने वाढ केल्यामुळे  राज्यातील आमदारांचे आता अच्छे दिन आले असल्याचं दिसत आहे.

सध्या मिळणारा आमदारांचा पगार

  • महागाई भत्ता 91,120 रुपये
  • दूरध्वनी खर्च80, 00 रुपये
  • संगणक चालकाचा पगार10, 000 रुपये
  • टपालासाठी 10, 000 रुपये
  • मूळ पगार67, 000 रुपये

दरम्यान यापूर्वी 2016 च्या पावसाळी अधिवेशनात आमदारांचे व माजी आमदारांचे वेतन, भत्ते तसेच निवृत्तिवेतन एकमताने वाढविण्यात आले होते. त्यानंतर आज प्रवास भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.

 

 

COMMENTS