विधानपरिषदेचा पराभव भाजपचा की फडणवीसांचा?

विधानपरिषदेचा पराभव भाजपचा की फडणवीसांचा?

सातारा (स्वप्नील शिंदे) – विधानपरिषदेच्या सहा जणांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे. तर महाविकास आघाडीने तब्बल चार जागांवर मुसंडी मारली. यात विशेषता भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर आणि पुणे या दोन पदवीधर मतदारांमध्ये पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे हा पराभव भाजपचा कि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अशी चर्चा रंगू लागली.

विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुक झाली. यात नागपूर, पुणे, मराठवाडा या पदवीधर मतदारसंघ, अमरावती आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील सार्वत्रिक आणि धुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची पोटनिवडणूकाचा निकाल स्पष्ट झाला. धुळे मतदारसंघातून भाजपचे अमरिश पटेल यांनी विजय मिळवला. अमरिश पटेल मूळचे काॅग्रेसचे असून त्यांनी एक वर्षापूर्वी आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. या मतदारसंघातून पटेल अनेक वर्षांपासून प्रतिनिधित्व करीत आहेत. ही जागा चार जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळला. अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराने बाजी मारली.

या निवडणुकीत झालेला पराभव भाजपच्या जिवारी लागला असून त्यांना आत्मपरिक्षण करायला लावणार आहे. तरी सुध्दा हा पराभव कोणाचा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागपूर मतदारसंघ पहिल्यापासून भाजपच्या बाजूने राहिला आहे. या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांचे वडिल गंगाधरराव फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विद्यमान आमदार अनिल सोले यांनी प्रतिनिधित्व केले. मात्र, यावेळी फडणवीस यांनी सोले यांना डावलून नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी दिली. यामुळे गडकरी गटात नाराजी पसरली. त्यांनी नाराजी व्यक्त न करता जे करायचे ते केले. त्यांच्याकडून उमेदवार लादल्याची बोलले जात होते. तशीच परिस्थिती मराठवाडा मतदारसंघात झाली. मागील निवडणुकीत पराभव पत्कारलेल्या शिरीष बोराळकर यांना उमेदवारी ही उमेदवारी पंकजा मुंडे यांच्या गटाला पटली नाही. त्याचे समर्थक रमेश पोखळे यांनी बंडखोरी करीत आपला शड्डू ठोकला. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला अपयश आले.

पुणे पदवीधऱ मतदारसंघातून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन वेळा प्रतिनिधीत्व केले. एक अपवाद जनता पक्षाचे शऱद पाटील यांनी जावडेकरांचा पराभव केला. ३० वर्षे भाजपच्या ताब्यात असलेल्या गडात भाजपने अत्यंत नवख्या अशा संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली. सुरुवातीला अनेक नावे चर्चेत होती. मात्र, अचानक देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. राज्यातील सर्व उमेदवारी निश्चित करण्यात फडणवीस यांचा महत्वाचा वाटा होता. त्यांचा प्रचारही केला. मात्र, ही निवडणुक वैयतिक आरोपप्रत्यारोप, जातीय समीकरण आणि नियोजनामुळे महाविकास आघाडीने बाजी मारली. फडणवीस यांनी भाजप उमेदवारी दिल्याने इतर नेत्यांनी प्रचारात ताकद लावली नाही. केवळ उपस्थित राहण्याचे सोपस्कर पार पाडले. त्यामुळे हा पराभव भाजपचा नसून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचा आहेत, अशी चर्चा आहे.

COMMENTS