विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता, 11 व्या जागेसाठी  “या” नावाची चर्चा !

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता, 11 व्या जागेसाठी  “या” नावाची चर्चा !

नागपूर – विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी सर्वच पक्षांकडून निवडणुक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भाजपनंही निवडणुक ताकदीप्रमाणे 5 उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने 2, काँग्रेसने 2 तर राष्ट्रवादी काँग्रेसने 1 उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. तर 11 व्या जागेसाठी शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे अर्ज भरण्याची शक्यता आहे.

दरम्यान भाजपकडून जी नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. ठाण्यातील कोळी महासंघाचे नेते रमेश पाटील यांचं नावही चर्चेत आलं आहे. ठाणे आणि कोकण परिसरात असलेलं कोळी मतांचं गणित लक्षात घेऊन पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या शिवाय विद्यमान आमदार भाई गिरकर, नागपूरचे माजी महापौर प्रविण दटके किंवा संदीप जोशी, दलित चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मिलींद कांबळे, राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील, विद्यमान मंत्री महादेव जानकर आणि चंद्रपूरमधील एका महिलेचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामधील कोणती नावे अंतिम होतात ते पहावं लागेल.

COMMENTS