विधान परिषदेच्या नवव्या जागेसाठी चुरस, भाजपकडून जागा जिंकण्याचा दावा तर महाविकास आघाडीचीही बैठकीत रणनीती ?

विधान परिषदेच्या नवव्या जागेसाठी चुरस, भाजपकडून जागा जिंकण्याचा दावा तर महाविकास आघाडीचीही बैठकीत रणनीती ?

मुंबई – राज्यातील विधान परिषदेच्या नवव्या जागेसाठी जोरदार चुरस पहायला मिळत आहे.
भाजपचा चौथा उमेदवार म्हणजेच विधान परिषदेची नववी जागा सहज निवडून आणणार असल्याचा दावा भाजपचे नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर या जागेसाठी महाविकास आघाडीकडूनही जोरदार प्रयत्न केले जात असून रणनीती आखण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज विशेष बैठक पार पडणार आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा विळखा वाढत असतानाच आता राजकीय वातावरणही तापत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान रिक्त झालेल्या 9 जागांपैकी भाजपच्या 3, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3, काँग्रेसच्या 2 आणि शिवसेनेची 1 अशा एकूण 9 जागांचा समावेश आहे. संख्याबळाचा विचार केला तर महाविकास आघाडीच्या 5 आणि भाजपच्या 3 जागा सहज निवडून येणार असल्याचं दिसत आहे. राज्यातील पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजपकडे 105, शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादीकडे 54, काँग्रेसकडे 44, बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पार्टी 2, एमआयएम 2, प्रहार जनशक्ती 2, मनसे 1,स्वाभिमानी पक्ष 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1, जनसुराज्य पक्ष 1, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1, माकप 1, शेतकरी कामगार पक्ष 1, अपक्ष 13 आमदारांचा समावेश आहे.

त्यातून निवडून येण्यासाठी एका जागेसाठी 29 मतांची गरज असल्यामुळे या निवडणुकीत चुरस पहायला मिळणार आहे. तसेच काँग्रेसने सहाव्या जागेवर दावा केला आहे. त्याबाबत महाविकास आघाडीची आज बैठक पार पडणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS