मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज वर्धापन दिन सोहळा आहे. या सोहळ्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्याची घोषणा करणार असल्याची माहिती आहे. सकाळी 11 वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच 18 मार्चला शिवाजी पार्कवर पक्षाचा गुढीपाडवा मेळावा असणार आहे. या मेळाव्याला आवश्यक सर्व परवानग्या मनसेला मिळाल्या असल्याची माहिती पक्षाचे स्थानिक विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिली आहे.
दरम्यान शिवसेनेच्या दसरा मेळाव्याप्रमाणे मनसेचा गुढीपाडवा मेळावा असतो. 2016 पासून मनसेनं या परंपरेला सुरुवात केली आहे. दरम्यान चिरंजीव अमित यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज ठाकरे यांनी गेल्या वर्षी हा मेळावा रद्द केला होता. परंतु यावर्षी मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार असून याबाबतची घोषणा राज ठाकरे हे करणार आहेत.
COMMENTS