“पप्पू पुन्हा नापास झाला” भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात मनसेची पोस्टरबाजी !

“पप्पू पुन्हा नापास झाला” भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात मनसेची पोस्टरबाजी !

मुंबई – भाजपा आमदार राम कदम यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पोस्टरबाजी केली आहे. प्रजा फाऊंडेशनने काही दिवसांपूर्वीच मुंबईतील आमदारांच्या कामगिरीबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात भाजपाचे आमदार राम कदम यांचे स्थान ३२ वे म्हणजेच शेवटचं आहे. त्यावरुन मनसेनं पोस्टरबाजी केली असून यामध्ये पप्पू कान्ट डान्स साला, गोविंदा आला रे आला, पप्पू पन्हा नापास झाला असं म्हणत राम कदम यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच प्रजा फाऊंडेशननं आमदारांचं पोस्टर कार्ड जाहीर केलं. यामध्ये आमदारांच्या कामगिरीची माहिती देण्यात आली आहे. या माहितीत राम कदम हे शेवटच्या स्थानावर आहेत. याच संधीचा फायदा घेत मनसेनं या बॅनरमध्ये रामकदम यांच्या दहीहंडी उत्सवाचाही संदर्भ दिला आहे. पप्पू कान्ट डान्स साला| गोविंदा आला रे आला| पप्पू कान्ट डान्स साला| तुमचे अभिनंदन असे खिल्ली उडवणारे बॅनर आणि फ्लेक्स राम कदम यांच्या घरासमोर आणि घाटकोपरमध्ये लावण्यात आले आहेत.

COMMENTS