मनसेला मोठा धक्का, शिवसेनेत गेलेले सहाही नगरसेवक अधिकृत !

मनसेला मोठा धक्का, शिवसेनेत गेलेले सहाही नगरसेवक अधिकृत !

मुंबई – मनसेतून शिवसेनेत गेलेल्या ६ नगरसेवकांचा अधिकृत गटात समावेश करण्यात आला आहे. याबाबत विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली आहे. यामुळे मनसेला मोठा धक्का बसला असून पक्षांतर केलेल्या सहाही नगरसेवकांचा शिवसेनेतील प्रवेश अधिकृत असल्याचे स्पष्ट झालं आहे. तसेच मनेसतून फुटलेले ते ६ नगरसेवक आता शिवसेनेचेच असल्याची घोषणा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका सभागृहात केली असल्याची माहिती आहे.  अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, अश्विनी मतेकर, दिलीप लांडे, हर्षल मोरे, दत्ताराम नरवणकर या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेचे झाल्यामुळे आता शिवसेनेचं संख्याबळ ९३वर गेलं आहे. शिवसेनेचे स्वत:चे ८४, ३ अपक्ष आणि मनसेतून आलेले ६ नगरसेवक शिवसेनेच्या बाजूचे झाले आहेत. या सहाही नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासाठी मनसेकडून याचिका दाखल करण्यात आली होती.

 

COMMENTS