मुंबई – सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तब्बल नऊ तास चौकशी केली. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट ईडीलाच नोटीस पाठवली आहे. ईडी कार्यालयाचा फलक मराठीत लावण्यात यावा अशी मागणी मनसेनं केली आहे. मनसेनं ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये “महाराष्ट्रात शासकीय फलक हे मराठीत असायला हवेत, हे ईडी कार्यालय बहुदा विसरलं आहे पण आम्ही ह्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे,आणि ह्या नोटिशीची प्रत ईडीला पाठवली आहे. मराठी भाषा विभाग ईडीला मराठी फलकाची सक्ती करणार? असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
https://twitter.com/mnsadhikrut/status/1164841079650177024?s=19
दरम्यान राज ठाकरे यांनी कालच्या चौकशीनंतर आज आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकारच्या कितीही गोष्टी त्यांनी माझ्यावर केल्या तरी माझं थोबाड थांबणार नाही. मी योग्य वेळी तुमच्याशी बोलेन, असा इशारा राज यांनी दिला आहे. त्यानंतर मनसेनं आज ईडीला नोटीस पाठवली असून ईडी कार्यालयाचा फलक मराठीत लावण्यात यावा अशी मागणी मनसेनं केली आहे. त्यामुळे यावर आता ईडीकडून काय उत्तर मिळणार हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS