काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड पडली महागात, मनसेच्या 8 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड पडली महागात, मनसेच्या 8 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई – काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड मनसेच्या कार्यकर्त्यांना चांगलीच महागात पडलीय. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासह 8 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांना १८ डिसेंबरपर्यंत तुरुंगातच राहावे लागणार आहे.

काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह संतोष सरोदे, संतोष धुरी, दिवाकर पडवळ, अभय मालप, हरिश सोळंकी, योगेश चिले आणि विशाल कोकणे यांना अटक करण्यात आली आहे.या सर्व कार्यकर्त्यांची रवानगी भायखळ्याच्या ऑर्थररोड कारागृहात करण्यात आली असून संदीप देशपांडे आणि सात कार्यकर्त्यांच्या जामीन अर्जावर ६ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

1 डिसेंबररोजी सीएसटी जवळील काँग्रेसच्या आझाद मैदानाजवळील कार्यालयात घुसून मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या काचा फोडल्या होत्या. या हल्ल्याची जबाबदारी मनसेने स्वीकारली होती. तशा आशयाचे ट्विटही मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले होते. यानंतर या घटनेचे सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांनी संदीप देशपांडेंसह आठ जणांना अटक केली. फेरीवाल्यांवरुन काँग्रेस विरुद्ध मनसे असा संघर्ष सुरु झाल्यावर ही तोडफोड झाली होती. दरम्यान ही तोडफोड मनसेच्या कार्यकर्त्यांना चांगलीच महागात पडल्याचं दिसतंय.

 

COMMENTS