मुंबई – मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल सुरू करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज ‘सविनय कायदेभंग’ आंदोलनाचा इशारा दिला होता. हे आंदोलन होऊ नये यासाठी रेल्वे पोलिसांनी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना नोटीस बजावली होती. मात्र ही नोटीस झुगारून संदीप देशपांडे, संतोष धुरी, गजानन काळे यांनी गनिमी कावा करत सकाळीच रेल्वे प्रवास केला. रेल्वे प्रवासाचा त्यांचा विडिओ त्यांनी प्रसारित केला आहे.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना काल र मुंबई रेल्वे पोलिसांनी ही नोटीस पाठवली आहे. जर नोटीसी विरोधात रेल्वेने प्रवास केल्यास कायदेशीर कारवाई करू असा इशारा रेल्वे पोलिसांनी मनसेला दिला होता. मात्र आंदोलनावर ठाम असणाऱ्या देशपांडे यांनी आज गनिमी कावा करत रेल्वे प्रवास केला आहे.
नोटीस आली तरी आम्ही आंदोलनावर ठाम होतो. आम्ही अनेकवेळा सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवास चालू करावा यासाठी राज्य सरकारकडे विनंती केली होती. चाकरमान्यांचे भरपूर हाल होत आहेत. सरकारचे डोळे उघडण्यासाठी आम्ही रेल्वे प्रवास करत सविनय कायदेभंग करत आहोत असे देशपांडे यांनी सांगितले.
COMMENTS