मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या खंद्या कार्यकर्त्यांनं भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. वयाच्या १६व्या वर्षापासून राज ठाकरे यांचे कार्यकर्ता असलेला हृषीकेश जोशी भाजपात जाणार आहेत. कर्जत नगरपरिषद राष्ट्रवादी आघाडीस पाठिंबा देऊ नये असे पक्षाला विनवले असताना देखील पक्षाने ऐकले नाही त्यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं हृषीकेश जोशी याने म्हटले आहे. तसेच निवडणुकीत आपल्याला घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढण्याची स्थानिक नेतृत्वाची ऑफर होती व तसच वैयक्तिक लढायची विनंती करून देखील मी लढलो नाही. परंतु पक्षानं आपलं ऐकलं नसल्याची नाराजी त्याने व्यक्त करुन दाखवली.
दरम्यान हृषीकेश जोशी हा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा पहिला मुंबई विद्यापीठ अध्यक्ष पदाचा उमेदवार होता. तसेच रत्नागिरीत राज ठाकरेंसोबत वयाच्या विसाव्या वर्षी अटक झालेला सर्वात कमी वयाचा आरोपी अशी त्याची ओळख आहे. तसेच त्याने मनसेच्या अंबरनाथ, डोंबिवली, कल्याण, कळवा अशा हजारोंच्या सभेत जोशी याने भाषण केले असून विद्यार्थी संघटनेसाठी सुमारे १०० हुन अधिक आंदोलनं केली आहेत. हृषीकेश जोशी हा व्यवसायाने वकिल असून सनद घेण्याआधी त्याने सुमारे ६ वर्ष रत्नागिरीला केस साठी आरोपी म्हणून फे-या मारल्या होत्या. पक्षाने आपल्याला नेहमीच मदत केली असल्यामुळे मी मनसेचा आभारी असल्याचंही त्याने म्हटलं आहे.
COMMENTS