मुंबई – मनसेच्या शिष्टमंडळानं आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे.भेटीनंतर मनसे नेेेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बचत गटातून महिलांनी घेतलेलं लोन फेडण्यासाठी मॅक्रो फायनान्स कंपन्या तगादा लावत आहेत. या कंपनीनं व्यवसायासाठी कर्ज दिलं होतं. परंतु कोरोनामुळे त्यांचा व्यवसाय बंद झाला. त्यामुळे कर्ज परत करण अवघड झालं आहे. तरीही त्यांच्या घरी जाऊन फायनान्स कंपनीेेचे गुंड धमक्या देत आहेत. याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली असल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
COMMENTS