मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केंद्रीय गृहमंत्री मंत्री राजनाथ सिंह यांना पत्र पाठवले आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आपल्या गाडीत बसण्याची एक संधी द्या असे पत्र मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी राजनाथ सिंह यांना पाठवले आहे. काळे यांनीच ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आपल्या गाडीत बसण्याची एक संधी द्या….मनसेचे राजनाथ सिंगांना पत्र.. @TawdeVinod#VinodTawde #RajnathSingh pic.twitter.com/XFqt0oVxhh
— Gajanan Kale MNS (@GajananKaleMNS) April 17, 2019
या पत्रात काळे यांनी एका जुन्या व्हिडीओचा संदर्भ दिला आहे. राजनाथ यांच्या सुरक्षारक्षकाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आपल्या गाडीत बसण्यास रोखल्यापासून, महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना त्वरित मानसोपचाराची गरज आहे. त्यात कहर म्हणजे आपल्या पक्षाने त्यांना राज्याचे गृहखाते सुद्धा न देता निव्वळ शिक्षण खात्यावर बोळवण केल्यामुळे ते दिवसेंदिवस बरसटत चालले आहेत.
"ज्या माणसाला केंद्रीय मंत्री राजनाथ सिंहाच्या गाडीत बसताना त्यांचा अंगरक्षक झिडकारतो तो 'विनोदी' माणूस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आव्हान देणार?"- मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे #कोल्हापूर #राजगर्जना
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) April 16, 2019
दरम्यान पक्षात कोणी गंभीरपणे घेत नसल्याने मा. राजसाहेबांवर आरोप करुन आपण चर्चेत तरी राहू असा ‘विनोदी’ विचार करुन तावडे सध्या बेताल बडबड करत आहेत. मात्र आता हे सारे त्यांच्या अंगलट येऊ लागले आहे. तरी कृपया आपण महाराष्ट्रात येऊन एकदा या विनोदी तावडेंना आपल्या गाडीत बसू घ्यावे. जेनेकरुन त्यांची गृहमंत्रीपद न मिळाल्याची इच्छा जरी अपूर्ण राहिली असली तरी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या गाडीत बसण्याची इच्छा पूर्ण झाल्यामुळे, ते किमान पुन्हा समान्य माणसासारखे वागू लागतील असं काळेे यांनी या पत्रात म्हटले आहे.
COMMENTS