मुंबई – आगामी निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी मनसेनं आज मुंबईतील एमआयजी क्लबमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह पक्षाचे सरचिटणीस आणि नेते उपस्थित होते. या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी नेते आणि पदाधिका-यांची लोकसभा निवडणूक लढवावी की नाही याबाबात मते जाणून घेतली. बहुतेक नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असं मत बैठकीमध्ये व्यक्त केलं आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राज ठाकरे यांना दिला आहे.
राजकीय स्थिती पाहून, उमेदवार पाहून राज ठाकरे निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेणार आहेत. मनसेचे सरचिटणीस बाळा नांदगावकर यांनी बैठक संपल्यानंतर पत्रकारांना ही माहिती दिली. लोकसभा लढवलीच तर युती किवा आघाडी कोणाबाबरोबर करायची याबाबत या बैठकीत चर्चा झाली नाही असंही बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. त्यामुळे आता राज ठाकरे लोकसभा निवडणुक लढवण्याबाबत काय निर्णय घेतात त्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. 2014 च्या कटुअनुभव लक्षात घेता राज ठाकरेंना यावेळी लवकरात लवकर आणि ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे.
COMMENTS