लोकसभा लढवायची का ?  मुंबईत ‘मनसे’ चिंतन सुरू !

लोकसभा लढवायची का ?  मुंबईत ‘मनसे’ चिंतन सुरू !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मनसेही यामध्ये मागे नाही. पक्षाची एक महत्वाची बैठक सध्या मुंबईत वांद्रेच्या एमआयजी क्लबमध्ये सुरू आहे. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह पक्षाचे सरचिटणीस आणि अन्य नेते उपस्थित आहेत. आगामी लोकसभा निवडणूक पक्षाने लढवावी का ? या विषयावर या बैठकीत चिंतन होणार असल्याचं समतंय.

गेल्या लोकसभा निवडणुकीपासून पक्षाला जोरदार फटका बसला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पक्षाच्या धरसोड धोरणामुळे मनसैनिकांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे मतदानातून तर फटका बसलाच होता. मात्र पक्षाची प्रतिमाही खराब झाली होती. त्यामुळेच आता पक्षाकडून सावध पवित्रा घेतला जात आहे. लोकसभा निवडणुक लढवायची की केवळ विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करायचं या विषयावर या बैठकीत मतं व्यक्त केली जाणार आहेत. त्यानंतर पक्षाचे वरीष्ठ नेते निर्णय घेणार आहेत.

COMMENTS